संविधानाला हात लावाल तर,याद राखा- नवनीत भाष्कर यांचे प्रतिपादन

0
13
जनशक्तीच्यावतीने डॉ.आंबेडकर जयंतीदिनी ताक वाटप
गोंदिया,दि.18- डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे दलित,शोषित,पिडीत समाजाच्या हिताचे रक्षक होते. त्यांनी भारतीय संविधानाची निर्मिती केलीच शिवाय ते महान समाजसुधारकसुद्धा होते. डॉ.आंबेडकर स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री होते. त्यांनी समानता,स्वतंत्रता,समान काम-समान-वेतन,महिलांना मतदानाचा अधिकार असे अनेक कार्य त्यांनी करून सर्वांना न्याय देण्याचे कार्य केले. मात्र, आजघडीला मात्र, डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या कायद्याला भाजपा बदलविण्याचे षडयंत्र रचित आहे. त्तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाला हात लावाल तर आम्ही पेटून उठू असे प्रतिपादन जनशक्ती बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष आंबेडकरी युवा नेते नवनीत भाष्कर यांनी केले. ते डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित ताक वाटपाच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.स्थानिक जनशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भीमनगर चौकात भीमसैनिकांसाठी ताक वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष नवनीत भाष्कर, अमर ऊके, निर्मल राठोड,यादराम जाठव, बुलबुल सामंधा,अनिल दास, वुंâदाताई भाष्कर,रेनुका वासनिक, जे.बी.भाष्कर, अंजु राठोड,रंजु वासनिक हे प्रामुख्याने उपस्थित होते. दरम्यान वुंâभारेनग येथून निघालेल्या रॅलीतील शेकडो भीमसैनिकांना ताक वितरण करण्यात आले. ताक वितरण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुन्ना डोहरे, राकेश बोरकर,चित्रीव भालाधरे, सुमीत मेश्राम, सुनिल,अतुल गोलरित,चंदन साखरे, पिंटू डोंगरे, सुनिल चौव्हान यांनी परिश्रम घेतले.