भाजपच्या महिला आमदार मेधा कुलकर्णी यांना स्वाईन फ्ल्यू

0
10

पुणे- राज्यभरातल्या स्वाईन फ्ल्यूच्या साथीने पुण्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनाही ग्रासले आहे. मेधा कुलकर्णी यांना स्वाईन फ्लूची लागण झाली असून, येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उपचारांना त्या प्रतिसाद देत असल्याचे कुटुंबियांनी सांगितले.
मेधा कुलकर्णी यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील एका स्वतंत्र खोलीत उपचार करण्यात येत आहेत. त्यांच्या प्रकृतीत गतीने सुधारणा व्हावी, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.यासंदर्भात त्यांचे पती विश्राम कुलकर्णी यांनी सांगितले, की गेल्या काही दिवसांपासून मेधा यांना ताप आणि सर्दी होती. त्यांची वैद्यकीय तपासणी झाल्यावर रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. आम्हाला त्यांच्यापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यांच्यावर उपचार सुरु झाले आहेत.
मेधा कुलकर्णी यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे लवकर आढळून आल्याने काळजी करण्यासाठी स्थिती नाही, असे पुणे महापालिकेच्या वैद्यकिय अधिकाऱ्याने सांगितले आहे.