लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून समीर भुजबळ यांची चौकशी

0
10

मुंबई, दि. २० – दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी समीर भुजबळ यांची साडेतीन तास चौकशी करण्यात आली.
माजी सार्वजनीक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर लाच घेतल्याचे आरोप करण्यात आले आहेत. माजी सार्वजनीक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ हे शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या कार्यालयात गेले वर दुपारी तीनच्या सुमारास बाहेर आले. त्यांच्या चौकशी प्रकरणी त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. कॅग च्या अहवालातमध्ये महाराष्टॅ सदन बांधकामाच्या कंत्राटात राज्य सरकारचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आल्यावर विधीमंडळ कामकाजमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करता लोकलेखा समिती नेमण्यात आली होती. या प्रकरणी भुजबळ कुटुंबियांना ८२ कोटी रुपयांची लाच दिली असल्याचा आरोप असून, महाराष्ट्र सदन घोटाळ्याबाबत छगन भुजबळ यांचीही चौकशी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.