मोदी यांनी रेल्वेत चहा विकलाच नाही

0
11

नवी दिल्ली- रेल्वे बोर्डाकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चहा विकल्याची कोणतीही नोंद उपलब्ध नाही. आरटीआयअंतर्गत काँग्रेस समर्थक सामाजिक कार्यकर्ते तहसीन पूनावाला यांनी दिलेल्या अर्जावर रेल्वे बोर्डाने म्हटले आहे की, मोदींनी रेल्वेत चहा विकल्याचा कोणताही वैध पुरावा अथवा कागदपत्रे नाहीत. मोदींनी रेल्वेगाड्या किंवा स्टेशनवर चहा विकण्यासाठी नोंदणी क्रमांक किंवा पास देण्यात आला होता का, अशी माहिती पूनावाला यांनी विचारली होती.

‘रेल्वेच्या पर्यटन व खानपान संचालनालयाकडे यासंबंधी कोणतीही माहिती उपलब्ध नाही,’ असे उत्तर रेल्वे बोर्डाने दिले आहे. आपले प्रारंभीचे जीवन अत्यंत गरिबीत गेल्याचे आणि रेल्वेत चहा विकून उदरनिर्वाह चालवल्याचे मोदी यांनी अनेक वेळा भाषणात ठासून सांगितले होते.