संत तुकाराम महाराज पालखीचे वेळापत्रक तयार

0
12

पुणे,दि.02 : आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र देहू येथून निघणाऱ्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे वेळापत्रक तयार झाले आहे. तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा 5 जुलैला होणार असून, श्री क्षेत्र देहूतील इनामदार वाड्यात पालखीचा पहिला मुक्काम होईल. दुसऱ्या दिवशी 6 जुलैला पालखीचे प्रस्थान होऊन अनगडशहा बाबा अभंग आरती, चिंचोली पादुका अभंग आरती करत निगडी मार्गे आकुर्डी मधील श्री विठ्ठल मंदीरात पालखीचा दुसरा मुक्काम असतो.तिसऱ्या दिवशी म्हणजे 7 जुलैला संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यात पोहचणार असून, नाना पेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदीरात पालखीचा तिसरा मुक्काम असतो. पुण्यातील 8 जुलैच्या एक दिवसाच्या मुक्कामानंतर 9 जुलैला पालखी पंढरपुराच्या दिशेने प्रस्थान करेल.