रेल्वे अर्थसंकल्प निराशाजनक – सोनिया गांधी

0
8

नवी दिल्ली – रेल्वे अर्थसंकल्पाने मोठी निराशा केली असून संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्याच काही योजना नव्याने मांडल्याची टीका कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे.

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी लोकसभेत रेल्वे अर्थसंकल्प सादर केला असून त्यामध्ये कोणत्याही नव्या रेल्वेची घोषणा केलेली नाही. या अर्थसंकल्पावर विविध स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असून कोणत्याच नव्या रेल्वेची घोषणा न केल्याने बहुतेकजण या अर्थसंकल्पावर नाराज असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनीही प्रतिक्रिया देताना रेल्वे अर्थसंकल्पाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच महाराष्ट्राच्या हाती काहीच लागले नसल्याचेही ते पुढे म्हणाले. माजी रेल्वे मंत्री पवनकुमार बन्सल यांनीही, “माझ्यासाठी हा निराशाजनक अर्थसंकल्प असून रेल्वेच्या दरात कपातीची अपेक्षा होती.‘