जात प्रमाणपत्रावरुन महसूल आणि सामाजिक न्याय विभागात खडाजंगी

0
21

मुंबई: राज्यभर महसूल अधिकाऱ्यांनी आजपासून जात प्रमाणपत्र न बनवण्याचा निर्णय घेतला आहे. जात प्रमाणपत्र बनवणे आणि जात पडताळणी करण्याचं काम महसूल विभागाचे अधिकारी करत आहेत. पण नुकतचं सामाजिक न्याय विभागाने एक परिपत्रक काढून जात पडताळणीचं काम हे आता सामाजिक न्याय विभागातले अधिकारी करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

त्यामुळे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी जात प्रमाणपत्र बनवण्यापासून ते तपासण्यापर्यंत सर्व कामे सामाजिक न्याय विभागालाच सोपवा अशी मागणी करून सरकारची कोंडी केली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे हे दोनही विभाग भाजपच्याच अखत्यारीत येतात.

फडणवीस सरकारमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेले एकनाथ खडसे हे महसूल विभागाचे मंत्री आहेत तर राजकुमार बडोले हे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री आहेत. त्यामुळे दोन विभागांमध्ये तयार झालेला हा वाद कुठल्या टोकाला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.