सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

0
34

अर्जुनी मोरगाव(सुरेंद्र ठवरे)दि.26 : फुले शाहू आंबेडकरी विचारांना समाजात सातत्याने पोचवून सामाजिक समात निर्माण करण्यासाठी धडपडणार्या सामाजिक कार्यकर्त्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त प्रा.डॉ. सविता बेदरकर(भुरले) यांचा सामाजिक न्यायमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री इंजि. राजकुमार बडोले  यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
बोंडगावदेवी निवासी पत्रकार अमरचंद ठवरे यांच्यावतीने समाजातील कर्तव्य निष्ठांचा त्यांच्या अप्रतिम कार्याबद्दल गौरव करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गोंदियाच्या महिला सामाजिक कार्यकर्त्या प्रा. सविता बेदरकर जिल्ह्यातील अनाथ मुलांना सर्वोतोपरी मदत करुन पालकत्वाची जवाबदारी पार पाडण्यासाठी धावून जातात. समाजातील महिलांवर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार करुन अन्यायग्रस्त महिला-युवतींना न्याय मिळवून देण्यासाठी शर्तीचे प्रयत्न अविरतपणे करीत असतात. आजघडीला समाजातील दानदात्यांच्या मदतीने जिल्ह्यातील ४० अनाथ मुलांना सर्वतोपरी मदत करुन त्यांच्या शिक्षणासाठी त्याग करुन जवाबदारी सांभाळीत अहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन स्थानिक सार्वजनिक रंगमंचकावर आयोजित कार्यक्रमात राज्याचे पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर, गटविकास अधिकारी नारायण जमईवार, उमाकांत ढेंगे, सरपंच राधेशाम झोळे, जि.प.सदस्य कमल पाऊलझगडे, पोलीस निरीक्षक शिवराम कुंभरे, वनपरिक्षेत्राधिकारी छगन रहांगडाले, वन समितीचे अध्यक्ष डॉ. शामकांत नेवारे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे आदि मान्यवर उपस्थित होते.या वेळी उपस्थित मान्यवरांनी बेदरकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकत गौरव केला. संचालन अमरचंद ठवरे यांनी केले.