आदिवासी ८१ विद्यार्थ्यांना महाराष्ट्र दर्शन

0
33

गडचिरोली ,दि.29(अशोक दुर्गम) : गडचिरोली पोलीस दलामार्फत आदिवासी मुलांमुलीसाठी महाराष्ट्र दर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत ८१ विद्यार्थी महाराष्ट्र दर्शनासाठी गडचिरोली येथून रवाना झाले आहेत. यामध्ये नक्षल पीडित व नक्षल्यांचे नातेवाईक यांचा सुध्दा समावेश आहे.
सहलीनिमित्ताने आयोजित कार्यक्रमाला अप्पर पोलीस महासंचालक डी. कनकरत्नम, विशेष पोलीस महानिरिक्षक शरद शेलार, पोलीस उपमहानिरिक्षक अंकुश शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, डॉ. हरी बालाजी, डॉ. मोहितकुमार गर्ग, अहेरीचे अप्पर पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल आदी उपस्थित होते.
बाहेरील जगाने केलेली प्रगती लक्षात व्हावी, यासाठी पोलीस विभागाच्या मार्फत दुर्गम व आदिवासी बहुल भागातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र दर्शन सहलीसाठी पाठविले जात आहे. जगाने केलेली आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक प्रगती बघितल्यानंतर अशीच प्रगती आपल्यालाही साधता येईल, असे सकारात्मक दृष्टीकोण त्यांच्यामध्ये निर्माण व्हावा, या उद्देशाने महाराष्ट्र दर्शन सहलीचे अयोजन केले जात आहे. २०१३ पासून हा उपक्रम राबविला जात असून ही २१ वी सहल आहे. आजपर्यंत १ हजार ६२६ मुलामुलींना याचा लाभ देण्यात आला आहे.कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी शेखर सिंह अप्पर पोलीस महासंचालक डी. कनकरत्नम यांनी मार्गदर्शन केले.