माजी खासदार सदाशिवराव मंडलीक यांचे निधन

0
11

कोल्हापूर- माजी खासदार सदाशिवराव मंडलीक यांचे मंगळवारी मुंबईत हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. सदाशिवराव मंडलिक गेल्या काही काळापासून मुत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त होते. त्यामुळे त्यांच्यावर बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरु होते. मंडलीक यांचे पार्थिव आता कोल्हापूरातील रूईकर कॉलनीतील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात येत आहे. त्यानंतर कागल तालुक्यातील मुरगुड येथे त्याच्या मुळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
सदाशिवराव मंडलीक यांचा जन्म ७ आक्टोंबर १९३४ रोजी झाला होता. कागल विधानसभा मतदारसंघातुन त्यांनी १९७२, १९८५, १९९० आणि १९९५ अशा चार वेळा त्यांनी निवडणूक लढवून मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला होता. १९९३ला त्यांना राज्याचे शिक्षण, पाटबंधारेसह अन्य खात्याचे राज्यमंत्री म्हणुनही काम करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर ते कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातुन सलग तीन वेळा निवडूनही आले होते.