मास्क लावून आमदारांनी केला शासनाचा निषेध

0
10

मुंबई- राज्यात स्वाइन फ्लूचे रुग्ण रोज वाढत आहेत. स्वाइन फ्लूचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकार पुरेशा गांभीर्याने पावले उचलत नसल्याने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे,काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, आ. हेमंत टकले, किरण पावसकर, सतीश चव्हाण, दीपक साळुंखे,आमदार राजेंद्र जैन आदींनी काँग्रेसच्या आमदारांसह विधान भवनाच्या प्रवेशद्वारी मास्क लावून निदर्शने केली. स्वाइन फ्लू नियत्रंणात आणण्यासाठी सरकारकडे कोणतीही यंत्रणा नाही. सरकारी हॉस्पिटलमध्ये या रुग्णांसाठी जागा शिल्लक नाही. खासगी हॉस्पिटल स्वाइन फ्लूच्या रुग्णांना दाखल करून घ्यायला तयार नाही. कॉम्बिफ्लूच्या गोळ्या काळ्या बाजारात विकल्या जात आहेत. सरकार गंभीर नाही, त्यामुळेच स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढत आहेत, असा आरोप या वेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनी या वेळी केला.आमदार राजेंद्र जैन यांनीही गोंदिया भंडारा जिल्ह्यातील आरोग्यसेवा विस्कळीत झाल्याचा मुद्दा उपस्थित करीत जिल्ह्यातही परिस्थिती गंभीर असूनही सरकारचे लक्ष नसल्याचा आरोप केला आहे.