बैलगाडा मालकांचे आळंदीत लाक्षणिक उपोषण

0
12

पुणे – अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील बैलगाडा मालकांनी केंद्र सरकारचे बैलगाडा शर्यतीवर बंदी उठविण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आळंदीमध्ये लाक्षणिक उपोषण केले.

बैलगाडा मालक बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याच्या मागणीसाठी आक्रमक झाले असून आळंदीमध्ये इंद्रायणी नदीच्या घाटावर उपोषणाला सुरुवात झाली. बैलगाड्या शर्यती सुरु झाल्याच पाहिजेत, बैलगाडा शर्यत सुरु करा, ग्रामीण व सांस्कृतिक परंपरा राखा अशा घोषणा बैलगाडा मालकांनी दिल्या. प्राणी छळ प्रतिबंधाबाबतच्या राजपत्रातील बैलाचा समावेश वगळून किंवा कायद्यात बदल करून बैलाचे प्रदर्शन व शर्यती पुन्हा सुरु कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. शेकडो बैलगाडा मालक व शौकीन या आंदोलनात सहभागी झाले होते.