विश्वसुंदरीने गायली जात्यावरची गाणी

0
16

धुळे : विश्वसुंदरी रोलेन स्ट्रॉस आणि मॉडेल मिस ज्युलिया या दोघी सध्या भारतातील आदिवासी समाजजीवन जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्याचाच भाग म्हणून शिरपूर तालुक्यातल्या आदिवासी पाड्यांना त्यांनी भेट दिली.

इथल्या लोकांनी या मिस वर्ल्डचं पारंपरिक पद्धतीने स्वागत केल्यानंतर तिने आदिवासी नृत्यावर ठेकाही धरला. इतकंच नाही तिने त्यांच्या घरात जात्यावरचं दळणही दळलं.शिरपूरमधील जलसंधारणाची कामं आणि आदिवासींचं लोकजीवन यानं आपण प्रभावित झाल्याची भावना या दोघींनी व्यक्त केली. त्याचसोबत जलसंधारणाचा शिरपूर पॅटर्न सातासमुद्रापार नेऊ, असं आश्वासनही मिस वर्ल्ड रोलेन स्ट्रॉसने दिलं.