दिलीपभाऊंची घरवापसी,राष्ट्रवादीच्या वरिष्ठांनी फिरवली पाठ

0
37

खेमेंद्र कटरे
गोंदिया-गेल्या आक्टोबंर महिन्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने बंडखोरी करीत दिलीप बनसोड यांनी स्वतंत्र उमेदवारी थाटत रिंगणात राहिले.कपबशी या निवडणुक चिन्हावर त्यांनी ही निवडणूक लढवित रंगत आणली होती,राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराला त्यांना पाणी पाजले होते अखेर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव करण्यात बनसोड यांना यश आले त्यांच्या निवडणुकीतील रिंगणात राहिल्याने भाजपला यश मिळाले.बनसोड यांनी बंडखोरी करुन रिंगणात उभे राहण्याचा निर्णय घेतला तेव्हाही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु त्यांनी प्रफुल पटेलांचेही एैकले नाही आणि रिंगणात राहिले आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहिर झाल्या त्यातच जानेवारीत आरक्षणाची घोषणा होताच बनसोड यांनी आपल्या नेतृत्वात पॅनल जिल्हा परिषदेची निवडणुक लढवेल अशी घोषणा करुन काही उमेदवारांच्या नावाची घोषणा सुध्दा केली होती.तेव्हाही असेच वाटले होते की बनसोड आता राष्ट्रवादीत काही परत जाणार नाही आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एक सक्षम पॅनल रिंगणात उतरवतील परंतु घोडे कुठे अडले कुणास ठाऊक बनसोड यांची राजकीय चक्र उलटी फिरली.भाजपचे दिग्गज नेते व जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि दिलिपभाऊंना कुठतरी आपलं चुकतय असेच वाटू लागले असावे असे वाटते त्यातच खरे मित्र असलेले नरेश माहेश्वरी यांनीही दिलीपभाऊना समजवल असाव त्यानंतर त्यांनी प्रफुलभार्इंच्या दिल्लीच्या बंगल्याची वाट धरली.दर्शन घेतले आणि शनिवारचा दिवस आपल्या घरवापसीचा निवडला.ज्या तोèयाने दिलीपभाऊ राष्ट्रवादी सोडली त्या तोèयानेच दिलीपभाऊंच्या वापसीला वजन मिळायला हवे होते परंतु काय वाईट दिवस आले एवढा मोठा नेता राष्ट्रवादीत परत येतो त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे दिग्गज राष्ट्रीय नेते आणि या जिल्ह्याचे पक्षाचे पालनकर्ते प्रफुल्ल पटेलही उपस्थित राहू शकले नाही.पटेल साहेब येऊ शकले नाही ठिक पण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षही आले नाही ते तर सोडा जे गेले १५ वर्ष या जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले,ज्यांच्याकडे या जिल्ह्याचे राष्ट्रवादीने प्रभारीपद दिले त्या अनिल देशमुखांनाही दिलीपभाऊंच्या परतीच्या प्रवेशाचा साक्षीदार व्हावेसे वाटले नाही.यापेक्षा दिलीप भाऊ तुमच्या परतीच्या राजकारणाचा काय अर्थ राहिला.विजयभाऊच्या पक्षप्रवेशाला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षच नव्हे,भाईजी,आजी माजी आमदारही हजर होते.शेजारच्या जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेतेही उपस्थित होते,परंतु तुमची वापसी तुमच्याच घरातील वèहांड्यात झाली याला काय म्हणावे.तुमच्या सारख्या स्वाभीमानी नेत्याला कस काय राजकारण कळल नाही हेच कळेना.
राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप बनसोड यांची राजकीय कारर्कीद तशी राष्ट्रवादी काँग्रेसपासूनच सुरु झाली.राष्ट्रवादीच्या मदतीनेच ते जिल्हा परिषदेत निवडून आले आणि समाजकल्याण सभापती बनले.सभापती पदावरच असतांना राष्ट्रवादीने त्यांना तिरोडा विधानसभा मतदारसंघाची निवडणुक आली आणि त्यांना उमेदवारी मिळाली.त्या निवडणुकीत त्यांना विजय मिळाला भाजपच्या उमेदवारांचा पराभव करीत ते विधानसभेत पोचले.आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात ते एवढे लोकप्रिय झाले की जनता त्यांना मतदारसंघाचा विकासपुरुष समजायला लागली.त्यातच तिरोडा येथे अदानी समुहाचा मोठा प्रकल्प आला आणी येथूनच त्याची लोकप्रियता वाढली.प्रफुुल पटेल आणि राजेंद्र जैन यांच्यानंतर राष्ट्रवादीत तिसरा ताकदवार नेता म्हणून दिलीप बनसोड पुढे आले हे सुध्दा नाकारु शकत नाही.त्यानंतर तिरोडा मतदारसंघ आरक्षणातून मुक्त होऊन तो खुला झाला येथूनच दिलीप बनसोड यांची राष्ट्रवादी पक्षाच्याप्रती थोडी नाराजी सुरु झाली कारण त्यांना त्यावेळी उमेदवारी नाकारत सुशील रहांगडाले यांना देण्यात आली.सुशील रहागंडाले अवघ्या हजाराच्या मतांनी पराभूत झाले ते सुध्दा तिरोडा शहरातील.परंतु तिरोडा पालिकेवर बनसोड यांचा एकहाती वर्चस्व हा राजकीय वर्चस्वच बनसोड यांच्या राजकीय कारकिर्दला दिशा देणारा ठरला.यातून बनसोड आणि राजेंद्र जैन यांच्यातील आंतरीक मतभेद उघड आहेत,अनेकदा चर्चेनुसार एैकावयासही मिळाले होते.आज त्यांच्याच नेतृत्वात बनसोड यांचा राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश झाला.