न्या. टहलियानी नवे लोकायुक्त

0
8

मुंबई दि.२२: मुंबईवरील २६/११च्या हल्ल्यातील दहशतवादी कसाबला फाशीची शिक्षा सुनावणारे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मदनलाल लक्ष्मणदास टहलियानी २८ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त होताच त्यांची महाराष्ट्राचे लोकायुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे.

राज्याचे नवे लोकायुक्त म्हणून न्या. टहलियांनी यांचा येत्या सोमवारी शपथविधी होणार आहे. राजभवनात राज्यपाल सी. विद्यासागर राव त्यांना शपथ देतील. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य मान्यवर उपस्थित राहतील. न्या. टहलियानी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून सेवानिवृत्त झाले.

राज्याला लवकरच बळकट लोकायुक्त देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी केली होती. पण सध्याच्या कायद्यात दुरुस्ती करून लोकायुक्तांना अधिक अधिकार प्रदान करणारा सशक्त कायदा अजून राज्य सरकारने केलेला नाही.