गोंदियाच्या जीभकाटे,चौधरी,कापगते व श्रीमती कुंभलकरांना आदर्श शिक्षक पुरस्कार

0
9

विदर्भातील २९ शिक्षकांना पुरस्कार जाहीर

५ सप्टेंबरला वितरण : राज्यात ९७ शिक्षकांची निवड

गोंदिया दि.२२: राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २0१४-१५ या वर्षीच्या राज्य शिक्षक पुरस्कारांकरिता ९७ शिक्षकांची निवड केली आहे. त्यामध्ये ३७ प्राथमिक, ३७ माध्यमिक, १८ आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे प्राथमिक शिक्षक असून दोन विशेष शिक्षक (कला व क्रीडा), एक अपंग शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षक, एक स्काऊट व एक गाईड शिक्षक यांचा पुरस्कारार्थींच्या यादीत समावेश आहे. ५ सप्टेंबर २0१५ रोजी खास समारंभात हे पुरस्कार वितरीत केले जाणार आहेत. प्रत्येकी एक लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
प्राथमिक शिक्षक: शुभांगी दिलीप पोहरे (नागपूर), नरेंद्र ओंकारराव भांडारकर (यवतमाळ), सुधीर धनराज अलोने (चंद्रपूर), कृष्णा शंकरराव निचत (अमरावती), दशरथ रतीराम जीभकाटे (गोंदिया), प्रविणकुमार मुत्तन्ना पुल्लुरवार (गडचिरोली), किरण शिवहर डोंगददिवे (बुलढाणा) सुरेश नत्थुजी लांजेवार (भंडारा),अब्दुल गफूर अब्दुल रशीद (वर्धा), अजय श्रीराम टाले (अकोला), गजानन साहेबराव गायकवाड (वाशिम). माध्यमिक शिक्षक : डॉ. मंगला चंद्रशेखर गावंडे (नागपूर), शरदचंद्र माधवराव पुसदकर (अमरावती), शंकर नेमाजी उराडे (चंद्रपूर), गजानन फकिरा डोईफोडे (अकोला),डॉ. अजय अन्नाजी येते (वर्धा), परसराम रामचंद्र चौधरी (गोंदिया), डॉ. श्रीराम महादेव महाकरकार (गडचिरोली), जयंत शांतवन रायबोडे (बुलढाणा), अरविंद हिंम्मतराव देशमुख (यवतमाळ),सुहासिनी श्रीधर घरडे (भंडारा).
आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षक : संघपाल तेजरामजी मेश्राम (नागपूर), नरेंद्र दिवाकर कांडुरवार (यवतमाळ), डॉ. रवींद्र विठोबा विखार (चंद्रपूर), सुरेंद्र शालिग्रामजी अर्डक (अमरावती),प्रभा नामदेव कुंभलकर (गोंदिया), विजय आनंदराव उरकुडे (गडचिरोली),
स्काऊट- गाईड शिक्षक यादी
माला महेंद्र चिलबुले (नागपूर)
अपंग शिक्षक/अपंग शाळेवरील शिक्षक
सुकराम दाजीबा कापगते (गोंदिया)