दिवाळीमध्ये सुट्‌ट्यांचा धमाका

0
11

मुंबई दि.२२–- यावर्षीची दिवाळी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा ‘सुट्‌ट्यांचा धमाका’ घेऊन येत आहे. जर एखादा सरकारी कर्मचारी ९ व १० नोव्हेंबर रोजी सुट्‌टी घेत असेल तर त्यास पूर्ण आठ दिवसाचे सुट्‌टयांचे पॅकेज मिळत आहेत. म्हणजेच ८ ते १५ नोव्हेंबरपर्यंत सुट्‌टी मिळेल. यातच दीवाळी, गोवर्धन पूजा आणि भाऊबीजही साजरी करता येईल.
८ नोव्हेंबरपासून १५ नोव्हेंबरपर्यंत केवळ दोन वर्किंग दिवस आहेत. पहिला वर्किंग दिवस ९ व दुसरा वर्किंग दिवस १० नोव्हेंबर आहे. हे दोन दिवस सीएलद्वारे समायोजित करा आणि आठ दिवसाच्या सुट्‌टया घ्या. या सुट्‌टयांचा सर्वाधिक लाभ त्या कर्मचाऱ्यांना मिळेल जे दुसऱ्या राज्यातील आहेत किंवा दीवाळीला कुठे बाहेर जाण्याची योजना आखत आहेत. या सुट्‌टयांच्या पॅकेजसाठी सरकारी कर्मचारी आतापासूनच नियोजन करत आहेत.

अशा सुट्‌टया
– ८ नोव्हेंबरला रविवार कार्यालय बंद राहतात
– ९ नोव्हेंबरला सोमवारी सरकारी कार्यालय उघडतील
– १० नोव्हेंबरला मंगलवारही कार्यालय सुरु राहतील
– ११ नोव्हेंबरला दीवाळीची सुट्‌टी आहे
– १२ नोव्हेंबरला गोवर्धन पूजेची सुट्‌टी आहे
– १३ नोव्हेंबरला भाऊबीजेची सुट्‌टी असेल
– १४ नोव्हेंबरला सेकंड सॅटर्डेची सुट्‌टी
– १५ नोव्हेंबर रविवारची सुट्‌टी आहेच
– १६ नोव्हेंबरला सर्व सरकारी कार्यालय सुरळीत सुरु होतील