चुकीचा रक्त गट लावलेल्या एका रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू

0
10

गोंदिया, दि.२३ जिल्हा सामन्य रुग्णालयात १८ सप्टेबर ला वर्षा साखरे या परिचारिकेने हलगर्जी पणा करत जिल्हा सामन्य रुग्णालयातील दोन रुग्णांना चुकीचा रक्त गट लावला होता. यापैकी ईश्वर उके या रूग्णांवर गोंदियाच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात उपचार सुरु होते. उके यांच्या शरीरात रक्ताचा इन्फेक्शन वाढल्यामुळे अखेर त्यांचा आज उपचार दरम्यान मृत्यू झाला. तर सय्यद अक्रम या रुग्णाला उपचारा करिता नागपूरला हलविण्यात आले आहे. मात्र घटनेला आज ५ दिवसाचा कालावधी लोटूनही वर्षा साखरे या दोषी परिचारिकेवर तसेच त्यावेळी हजर असलेल्या वैद्यकीय अधिकार्यावर अद्यापहि कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामूळे मृतकाच्या नातेवाईकांन मध्ये रोष निमार्ण झाला असून जिल्हा सामान्य रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. रवी धकाते आणि परिचारिका वर्षा साखरेसह वैद्यकिय अधिकारी दोघांना निलंबित करण्याची मागणी उके यांच्या नातेवाईकांनी केली आहे