स्मृती इराणी-तावडेंचा 100 कोटींचा पुस्तकघोटाळा

0
16

मुंबई दि.९: – ‘राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री स्मृती इराणी यांनी संगनमताने महापुरुषांच्या चित्र खरेदीत तसेच पुस्तक खरेदीत १०० कोटींचा घोटाळा केला’, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी गुरुवारी केला. इराणी तसेच तावडे यांची चाैकशी होईपर्यंत दोघांचीही मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे, अशी मागणीही मलिक यांनी पत्रकार परिषदेत केली.

केंद्र सरकारच्या योजनेचा हवाला देत तावडे यांनी खरेदीचे आदेश काढल्यामुळे यात केंद्रीय मंत्र्यांचाही सहभाग असल्याचे स्पष्ट झाला आहे, असे मलिक यांनी म्हणाले. तावडे यांनी घाईघाईने महापुरुषांची चित्रे व पुस्तके खरेदी करण्याचे आदेश तर काढलेच, पण ३१ मार्चपूर्वी खरेदी केलीच पाहिजे अशी सक्तीही केली. राष्ट्रपती, पंतप्रधान, शिवाजी महाराज, िजजामाता, महात्मा फुले आदी महापुरुषांची चित्रे व फोटो हे सरकारच्या छापखान्यात केवळ ११ रुपयांना मिळतात. तेच चित्रे व फोटो हे राष्ट्रीय उपभोक्ता महासंघ या सहकारी संस्थेकडून प्रत्येकी १३०० रुपयांना एक या दराने घेण्याची सक्ती तावडे यांनी शाळांना केल्याचे मलिक म्हणाले. पुस्तकघोटाळा