एमआयईटीतील सेसाच्या अध्यक्षपदी निखिल कटरे

0
8

गोंदिया,दि.9- येथील गोंदिया शिक्षण संस्थाद्वारा संचालित मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हील शाखेच्या नव्या सेसा कार्यकारीणीचे गठण करण्यात आले.यासाठी झालेल्या निवडणुकीत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.प्राचार्य डाॅ.एम.एस.राठोड,सिव्हिल शाखेचे प्रमुख डाॅ.सुरेंद्र असाटी,सेसा चे प्रभारी प्रा.व्हि.पी.शेंडे,डाॅ.देशपांडे,प्रा.आशिष नशिने,प्रा.कटरे,प्रा.अजित वाघमारे यांच्या उपस्थितीत ही निवडणुक घेण्यात आली.यात सिव्हिल शाखा स्टुडंट अशो.अध्यक्षपदी निखिल कटरे,सचिव ओवेश सोलंकी,उपाध्यक्ष निरज आहुजा तर सदस्यामध्ये दर्शन थेर,रोशन यादव,धवल पटेल,दिव्या रामानी,प्रशांत भगत,अंकुश हनवते,चंद्रमुखी शाहू,पायल बुुध्दे यांचा समावेश आहे.सेसा अध्यक्ष निखिल कटरे यांनी नव्या कार्यकारिणीसोबत मिळून एक नवीन विश्वास तयार करण्याचे आश्वासन देत आभार मानले.