पवार व तटकरे यांनी रोख ८०० कोटींची लाच घेतली – किरीट सोमय्या

0
8

मुंबई, दि. २३ – अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी ३०८ बोगस कंपन्या स्थापन करून ८०० कोटी रुपये लाटल्याचा आरोप खासदार किरीट सोमय्या यांनी केला असून इतकी प्रचंड रक्कम युनियन बँकेतून रोखीने काढल्याचा पुरावा असल्याचा दावाही केला आहे.
सोमय्या म्हणाले की, युनियन बँकेच्या खात्यातून एफए कन्स्ट्रक्शन या कंत्राटदाराने तब्बल ८०० कोटी रुपये काढले ते ३०८ बोगस कंपन्यांना दिले आणि या कंपन्यांकडून हे पैसे पवार व तटकरे यांच्याकडे वळवण्यात आले.
सोमय्या यांनी या प्रकरणाचे पत्र भारतीय रिझर्व्ह बँक व राज्याच्या वित्त सचिवांनाही दिल्याचे सांगितले आहे. बुधवारी प्रथमच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात अजित पवारांनी हजेरी लावली आणि तब्बल सहा तास त्यांची जबानी घेण्यात आली. याच संदर्भात सोमय्या यांनी केलेल्या आरोपांमुळे व दाव्यांमुळे पवार व तटकरे आणखी गोत्यात येतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.