राजकारणातली आयटम गर्ल आहे किरीट सोमय्या – मलिक

0
9

मुंबई : दि. २३ – राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी किरीट सोमय्या हे राजकारणातली आयटम गर्ल असल्याची टीका केली आहे. सोमय्यांनी सिंचन घोटाळ्यावरुन अजित पवार आणि सुनील तटकरेंवर केलेल्या आरोपांना उत्तर देताना नवाब मलिक यांनी ही टीका केली.

सिंचन घोटाळ्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी तब्बल ३०८ बोगस कंपन्या स्थापन केल्याचा खबळजनक दावा भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. अर्थखात्याचे सचिव आणि रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरना पत्राद्वारे सोमय्या यांनी ही माहिती दिली आहे.

यावेळी किरीट सोमय्यांना नवाब मलिक यांनी चोख प्रत्युत्तर दिले असून राजकारणातली आयटम गर्ल किरीट सोमय्या आहेत, अशी टीका नवाब मलिक यांनी किरीट सोमय्यांवर केली आहे. सोमय्यांच्या आरोपांना उत्तर देण्यास बांधील नसून त्यांनी चौकशी लावावी, दोषी आढळल्यास कारवाई करावी, सत्ता त्यांचीच आहे, असेही नवाब मलिक यावेळी म्हणाले.

नवाब मलिक यांच्या भाषेला आणि संस्कृतीला दाद देतो. किंबहुना अशाप्रकारचे शब्द वापरण्याची राष्ट्रवादीची संस्कृती आहे, असे प्रत्युत्तर यावेळी किरीट सोमय्यांनी दिले.