लाचखोर तहसीलदारला सक्तमजुरी

0
12

सातारा-दि.२८ : बिगर शेती प्रस्ताव अनुकूल करण्यासाठी 20 हजार रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या तत्कालीन खंडाळा तहसीलदार सुप्रिया सुभाष बागवडे यांना लाच लुचपत प्रतिबंधक कायदा कलम 7 नुसार 3 वर्ष सक्तमजुरी, 5 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 6 महिने साधी कैद तसेच कलम 13 (1) (ड) सह 13 (2) खाली 3 वर्ष सक्तमजुरी व 5 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 6 महिने साधी कैद अशी शिक्षा विशेष न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश श्रीमती व्ही.एम. मोहिते यांनी आज (बुधवार) सुनावली.

या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांनी करून विशेष न्यायालयात 27 मे 2013 रोजी दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर खटल्याची सुनावणी आज होऊन आरोपी लोकसेवक श्रीमती सुप्रिया सुभाष बागवडे, तहसीलदार खंडाळा यांना लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम 7 नुसार 3 वर्ष सक्तमजुरी, 5 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 6 महिने साधी कैद अशी शिक्षा विशेष न्यायाधीश श्रीमती व्ही.एम. मोहिते यांनी सुनावली. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता शामप्रसाद बेगमपुरे यांनी कामकाज पाहिले.