राष्ट्रवादीच्या बिल्यावर कमळाबाईचे चिन्ह

0
10

गोंदिया,दि.28- गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव ,देवरी ,सडक अर्जुनी आणि अर्जुनीमोरगाव या चार तालुक्यात तर भंडारा जिल्ह्यातील मोहाडी ,लाखनी,लाखांदूर या तीन तालुक्यात १ नोव्हेंबरला नगर पंचायतीकरिता मतदान होणार आहे.प्रचाराला काही काळ शिल्लक असल्याने राजकीय पक्ष चांगलेच सरसावले आहेत.परंतु सध्या सुरु असलेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकामध्ये एक वेगळ्याच प्रकरणाने नव्या चर्चेला उधाण आले ते म्हणजे भाजपच्या वतीन जे बिल्ले मतदारांना वितरीत करण्यात येत आहेत.त्या बिल्ल्यावर कमळाचे चित्र हटविले तर आतमध्ये राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि घडीचे चिन्ह बघायला मिळू लागले आहे.यामुळे मतदारात एकच चर्चेला उधाण आले त्यामध्ये राष्ट्रवादीच्या बिल्य्यावर कमळाचे चिन्ह यावर खलबते सुरु झाले आङेत.

केंद्र आणि राज्य सरकारने जिल्ह्यातील तालुका स्थळांचा विकास व्हावा म्हणून तालुकास्तरावरील ग्रामपंचायतीला विसर्जित करून नगर पंचायतीत रुपांतर केले. तर काही तालुके लोकसंखेच्या तुलनेत मोठे असल्याने त्या ठिकाणी लवकरच नगर परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे तालुका स्थरावरील लोकांना चागल्या नागरी सुविधा मिळणार आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ग्राम पंचायतीचे १७ प्रभागात विभाजन करून सर्वच राजकीय पक्षांनी प्रत्येक १७ हि ठिकाणी आपले उमेदवार उभे केले आहे. त्यामुळे आंत प्रचाराला काही तास शिलक असल्याने सर्वच राजकीय पुढारी मतदार राजाच्या घरी जाऊन किंवा ठीक ठिकाणी प्रचार सभा घेवून मतदाराला निवडून देण्याचे प्रलोभन देत आहेत.

गोंदिया आणि भंडारा जिल्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत काग्रेस आणि राष्ट्रवादी काग्रेस पक्षाला मोठे यश मिळांल्याने भाजपने हि नगर पंचायत निवडणुक आपल्या प्रतिष्ठेची करीत चागलीच कंबर कसली आहे. जिल्ह्यात होऊ घातलेल्या निवडणुकीत कुठल्याही पक्षाची युती झाली नाही मात्र गोंदिया जिल्यातील गोरेगाव ,देवरी ,सडक अर्जुनी आणि अर्जुनीमोरगाव या चार तालुक्यात भारतीय जनता पक्षाला पाठविण्यात आलेल्या प्रचार सामुग्रीत राष्ट्रवादी काग्रेस पक्षाच्या बिल्यांवर भारतीय जनता पक्षाने कमळाचे चिन्ह लावून वाटण्यात आल्याने भारतीय जनता पक्ष आणि आणि राष्ट्रवादी काग्रेस पक्षाची छुपी युती तर नाही ना अशी शंका सर्व सामान्य मतदारांच्या मनात येत आहेत.
या संदर्भात खासदार नाना पटोले यांना विचारणा केली असता राष्ट्रवादी काग्रेस पक्ष हा बोगस पक्ष आहे त्यामुळे त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी आमच्या पक्षात प्रवेश करून आमच्या मतदारांची दिशा भूल करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काग्रेस पक्षाने केला असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे