लोकसहभागातूनच वनसंवर्धन साध्य होणार- मुख्यमंत्री

0
8

ठाणे : ,दि.५ वनक्षेत्र टिकविणे हे आज मोठे आव्हान आहे. हे आव्हान पेलताना आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच लोकसहभाग महत्वाचा आहे. जोपर्यंत आपण वनावर आधारित उपजिवीका असणाऱ्यांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करुन देत नाही तोपर्यंत वन संवर्धन अशक्य आहे. लोकसहभाग हा वनसंवर्धनासाठी प्रभावी मार्ग असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे वन विभाग व रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने वनसंवर्धन आणि ग्रामीण उपजिवीकेची साधन सुरक्षा या विषयावर आयोजित एक दिवशीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी वित्त व नियोजन, वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, प्रधान वनसंरक्षक ए.के. निगम, वन विभागाचे सचिव विकास खारगे, म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक विनय सहस्त्रबुद्धे, आदिवासी विभागाचे सचिव राजगोपाल देवरा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी, ठाण्याच्या जिल्हाधिकारी अश्विनी जोशी, आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार आदी उपस्थित होते.