बिहार एग्झिट पोल-महाआघाडीच्या पारड्यात

0
5
वृत्तसंस्था
पाटणा, दि. ५ – बिहार विधानसभेच्या निवडणुकांचे एग्झिट पोल यायला सुरुवात झाली असून भाजपा प्रणीत रालोआ व नितिश कुमार मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असलेली महाआघाडी यांच्यात अत्यंत चुरशीची लढत असून दोघांनाही ११० ते १३० च्या दरम्यान, म्हणजे जवळपास सारख्याच जागा मिळतिल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे  न्यूज २४ आणि टुडेज चाणक्य यांनी भारतीय जनता पार्टी बिहार निवडणुकीत दणदणीत विजय मिळवेल असा वेगळाच अंदाज व्यक्त केला आहे. त्याच्या सर्व्हेनुसार भाजपाला १५५ जागा मिळतील, महाआघाडीला फक्त ८३ जागा तर अन्य पक्षांना ५ जागा मिळतील.
सिसेरो वगळता बाकी सगळ्या एग्झिट पोल्सनुसार पाच ते १० जागांनी का होईना नितिशकुमारांच्या नेत-त्वाखालील महाआघाडी रालोआच्या पुढे असणार आहे. दोन्ही आघाड्यांना ४० ते ४२ टक्के मतं मिळाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
भाजपाच्या नेत्यांनी या निवडणुकीत नितिशकुमारांची एग्झिट होईल असा दावा केला आहे तर महाआघाडीच्या नेत्यांनी बिहारी जनतेने नरेंद्र मोदी व भाजपाला पराभूत केल्याचा दावा केला आहे.
सी व्होटरच्या एग्झिट पोलनुसार
महागठबंधन –  ४२ टक्के मतं आणि १२२ जागा मिळतील.
भाजपाप्रणीत रालोआला ४१ टक्के मतं १११ जागा मिळतील.
इतर – १० जागा.
इंडिया टुडे-आयटीजी सिसेरोच्या एक्झिट पोलनुसार
भाजपाप्रणित रालोआला १२० जागा.
महागठबंधनला ११७ जागा मिळतील
इतर – ६ जागा
न्यूज एक्स – सीएनएक्सच्या एक्झिट पोलनुसार
महागठबंधनला १३० ते १४० जागा.
भाजपाप्रणित रालोआला ९० ते १०० जागा.
इतर – १३ ते २३ जागा.
न्यूज नेशनच्या एक्झिट पोलनुसार
भाजपाप्रणित रालोआला ११५ ते ११९ जागा
महागठबंधनला १२० ते १२४ जागा.
इतर ३ ते ५ जागा.