शनीशिंगणापूरच्या विश्वस्तपदी पहिल्यांदाच दोन महिलांची निवड

0
9
अहमदनगर, दि. ६ – शनीशिंगणापूरच्या इतिहासात पहिल्यांचा एक क्रांतिकारी घटना घडली आहे. येथील शनीशिंगणापूर देवस्थानाच्या विश्वस्तमंडळावर पहिल्यांदाच दोन महिलांची निवड करण्यात आली आहे.
देवस्थान विश्वस्तमंडळावर निवडल्या जाणा-या ११ सदस्यांपैकी दोन महिला सदस्यांचा समावेश आहे. यामध्ये अनिता शेटे आणि शालिनी लांडे या महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती अहमदनगर धर्मादाय आयुक्तांमार्फत करण्यात आली.
शनी मंदिरातील चौथऱ्यावर महिलांना जाण्यास बंदी असतानाही गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका महिलेने चौथ-यावर जाऊन शनीचे दर्शन घेतले तसेच देवाला तेलही वाहिले. यामुळे गावकरी संतप्त झाले व त्या निषेधार्थ शनी शिंगणापूर बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून बंद मागे घेतल्याचा दावा ग्रामस्थांनी केला.