पंतप्रधान ग्राम सडक योजनेतील रस्तेही गेले खड्ड्यात

0
27

खेमेंद्र कटरे

गोंदिया – वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाहनांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या काही वर्षात जिल्ह्यात तयार करण्यात आलेल्या पंतप्रधान ग्राम सडक योजनेतील रस्त्यांचा सुमार दर्जा आणि वाहनांची अधिक भारक्षमता यामुळे हे रस्त्यांची दुरवस्था असून अनेक रस्ते तर खड्ड्यात गेल्याचे चित्र आहे. रस्ता दुभाजक, झेब्रा क्रॉqसग आणि दिशादर्शक फलकाअभावी अपघाताच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. या रस्ते अपघातांमध्ये अनेकांना आपल्या प्राणास मुकावे लागले आहे तर कायमस्वरूपी अपंगत्व काहींच्या नशिबी आले आहे. शहर असो वा ग्रामीण भाग परिस्थिती सर्वत्र सारखीच. वर्षभरात शहरात दहा कोटींवर खर्च करूनही परिस्थिती ‘जैसे थेङ्कच आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मुख्य रस्त्यांना जिल्हा मार्गाशी जोडण्याचे काम गेल्या दहा-बारा वर्षापासून पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून सुरू आहे. उर्वरित रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत तयार करण्यात आलेल्या रस्ते हे गुणवत्ताविहीन असल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने तयार केलेले रस्ते हे निव्वळ गैरव्यवहाराचे कुरणच ठरले म्हटल्यास वावगे ठरू नये. जिल्ह्याची वाढती लोकसंख्या आणि दिवसेदिवंस वाहनांच्या संख्येत होणारी वाढ बघता जिल्हा मार्गांचे रुंदीकरण करणे अपरिहार्य झाले आहे. गोंदिया-तुमसर, गोंदिया-कोहमारा, कोहमारा-देवरी, कोहमारा -नवेगावबांध, गोरेगाव-ठाणा-आमगाव, गोंदिया-आमगाव-देवरी या महत्त्वपूर्ण रस्त्यांची दुरवस्था असून अलीकडे या मार्गावरील अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. याचे प्रमुख कारण अरुंद रस्ते आणि रस्त्यांच्या कडा हे आहे. आजच्या घडीला या सर्वच मार्गाचे चौपदरीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे.
वडसा-अर्जुनी मोरगाव-नवेगावबांध-कोहमारा या मार्गावरुन बांधकाम विभागाने जड वाहनांवर बंदी लादली आहे. असे असताना जलवाहतूक राजरोसपणे सुरू आहे. सदर रस्ता हा जडवाहनांसाठी योग्य नसताना चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील सर्वच जडवाहने याच मार्गाने राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर येतात. परिणामी, या मार्गाचे चौपदरीकरण ही काळाची गरज आहे. तिरोडा-गोंदिया या रस्त्यावर गोंदिया आणि तिरोडा येथे औद्योगीक वसाहत असल्याने जड वाहनांची येथे नेहमी वर्दळ असते. या मार्गावरसुद्धा अनेकदा मोठे अपघात होऊन अनेक कुटुंब रस्त्यावर आली आहेत. असे असताना कोणीही या रस्त्याच्या चौपदरीकरणाकडे आजतागायत लक्ष दिले नाही. काचेवानी, दांडेगाव,एकोडी ,डोंगरगाव सारख्या गावानजीक अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आमगाव ते देवरी हा राज्यमार्ग खूप जुना असून या रस्त्यावर अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. त्यातच रस्त्याचे डांबरीकरण योग्य होत नसल्याने वारंवार रस्ता अनेक ठिकाणी फुटल्याचे दिसून येते.
आमगाव-सालेकसा-दरेकसा हा छत्तीसगडला जोडणारा रस्ता आहे. परंतु, अद्यापही तो दुपदरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. वास्तविक या रस्त्याचे दुपदरीकरण झाल्यास महाराष्ट्र-छत्तीसगडचा संपर्क आणखी जलद होण्यास मदत होईल. अंतर्गत रस्त्यांकडे बघितल्यास नागझिरा व्याघ्र प्रकल्पासाठी महत्त्वाचा रस्ता असलेला गोरेगाव-खाडीपार-सुकडी-बिरसी फाटा या रस्त्याचे दुपदरीकरण पर्यटकांना हिताने महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे गोंदिया-कोहमारा मार्गावरील मुरदोली गावापासून पांढरीमार्ग,कोसमतोडंी-जांभळी-लाखनीला जोडणारा रस्ता हलक्या वाहनासाठी पर्यायी रस्ता ठरू शकेल. यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर निघणारे वाहन सरळ साकोलीजवळील बिरसीला पोचल्याने वेळ आणि इंधन खर्चात बचत होईल. उल्लेखनीय म्हणजे या रस्त्याच्या बांधकामावर आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च झाले असून हा रस्ता जंगलातून गेलेला आहे.
तिरोडा तालुक्यातील चिरेखनी ते रामसागर मार्गे तहसील कार्यालयाकडे जाणाèया रस्त्याचे बांधकाम तब्बल १५ वर्षानंतर मंजूर करण्यात आले. त्यासाठी १५ लाखांचा निधीसुद्धा मिळाला. परंतु, या रस्ता बांधकामात गैरव्यवहार झाल्याने रस्त्याचा दर्जा सुमार असल्याचा आरोप त्या मार्गावरील नागरिकांनी केला होता. विशेष म्हणजे याविषयी रस्ता तयार करणाèया कंत्राटदाराने कामाची गुणवत्ता राखली नसल्याची टिप्पणी तेथील शाखा अभियंत्याने सुद्धा केली होती, हे येथे विशेष.
त्याचप्रमाणे गोंदिया तालुक्यातील भानपूर ते सेजगाव खुर्द या गावाला जोडणाèया ९ लाख रुपयाच्या निधीतून रस्ता डांबरीकरणाच्या कोqटगचे काम करण्यात आले. त्या१ हजार ५०० मीटर डांबरीकरण रस्त्यावर डांबर नव्हे तर काळी राख घालण्यात आली की काय असे चित्र होते.
चिरेखनी ते रामसागर मार्गाने जवळपास अध्र्याअधिक तिरोडा तालुक्यातील जनता विविध कामांसाठी तहसील कार्यालय, पंचायत समिती, रेल्वे स्थानक व कृषी विभाग कार्यालयात ये-जा करते. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठया प्रमाणात खड्डे पडले असून अनेक ठिकाणचे डांबर उखडून संपूर्ण गिट्टी वर आली आहे. कंत्राटदाराने सदर रस्त्यावर केवळ अर्धा कि.मी.पर्यंत अत्यंत निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण केले. सदरचे निकृष्ट बांधकाम पाहून गावकèयांनी ते काम बंद पाडले होते. तसेच कंत्राटदाराने केलेले अर्धा कि.मी.चे डांबरीकरणसुद्धा अवघ्या पाच दिवसांतच उखडून गेले.
भानपूर रस्त्याचे ९ लाखाचे काम पूरग्रस्त निधीतून हे काम करण्यात आले आहे. तो रस्ताही अवघ्या वर्षभरानंतर उखडला गेला आहे. सालेकसा-वखारीटोला-तेलीटोला, सालेकसा-कावराबांध ते नवेगाव, तिरोडा तालुक्यातील बरबसपुरा-भिवापूर जोडरस्ता, तिरोडा-बेरडीपार-डब्बेटोला-बोरा हे रस्ते ग्रामीण विकास रस्ते महामंडळाच्या वतीने तयार करण्यात आलेले आहेत. आज त्या रस्त्यावरून जाणे येणे सुद्धा कठीण होत आहे. गोंदिया तालुक्यातील दवनीवाडा हे सर्वांत मोठे गाव. परंतु, या गावाला जोडणाèया जिल्हा मार्गाकडे बघितल्यास एकाही लोकप्रतिनिधीला या रस्त्याच्या दुरुस्तीची कशी आठवण होत नाही, हे कळायला मार्ग नाही. मोठमोठे खड्डे आणि उखडलेला डांबर बघून हा रस्ता आहे की काय अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आळी आहे. तीच अवस्था १०-१२ वर्षापूर्वी नाबार्डच्या निधीतून तयार करण्यात आलेल्या अदासी-तांडा-दवडीपार-झांजिया या रस्त्याची आहे. या रस्त्याच्या डांबरीकरणानंतर पुन्हा कधीही बांधकाम विभागाने साधे ढुंकूनही पाहिले नाही. या रस्त्यावरून साध्या सायकलस्वारालाही आपले जीव मुठीत घेऊन ये जा करावी लागते.
गोंदिया शहरात वाहतूक विभागाने जयस्तंभ चौक, नेहरू चौक, शक्ती चौकात झेब्रा क्रॉqसग आणि रस्ता दुभाजकाच्या निर्मितीच्या प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविला होता. परंतु, त्यांनी पूर्वीच रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी दहा कोटी खर्च करण्यात आले आहे. नगरपालिकेच्या अखत्यारीतील विषय असल्याने त्यांनी हा विषय हाताळावा, असा मुद्दा पुढे केला. यावरून वाहतूक विभाग, बांधकाम विभाग आणि नगरपालिकेत योग्य समन्वयाचा अभाव दिसून येत आहे.