देवरी येथे ६७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

0
20

 

जि.प. विद्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या शासकीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात पोलिस दलाकडून मानवंदना स्वीकारताना उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी (छाया- सुरेश भदाडे)

देवरी, (ता.२६)- भारतीय प्रजासत्ताकाचा ६६व्या वर्धापण दिनाचा शासकीय सोहळा स्थानिक जिल्हा परिषद विद्यालयाच्या क्रीडांगणावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान, ध्वजारोहणानंतर दिमाखदार सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी प्रेक्षणीय ठरली.
देवरी येथे भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक जि.प. पटांगणावर सकाळी सव्वा नऊच्या सुमारास आयोजित करण्यात आला होते. यावेळी ध्वजारोहण देवरीचे उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी यांचे हस्ते करण्यात आले. देवरीचे तहसीलदार संजय नागटिळक, अतिरिक्त पोलिस अधीक्षक संदीप पखाले, पोलिस निरीक्षक राजेंद्र तिवारी, नायब तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, गुरनुले, देवरीच्या नगराध्यक्ष सुमन बिसेन, पंचायत समिती सभापती देवकी मरई, उपनगराध्यक्ष ओमप्रकाश रामटेके, प्रमोद संगीडवार, छोटेलाल बिसेन, वकील संघाचे अ‍ॅड. प्रशांत संगीडवार यांची उपस्थिती होती. ध्वजारोहणानंतर श्री. सूर्यवंशी यांनी परेडचे निरीक्षण केले. पोलिस दलाच्यावतीने सहायक पोलिस निरीक्षक शाहूराज रणवरे यांच्या नेतृत्वात राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. शालेय विद्याथ्र्यांच्या पथकामध्ये छत्रपती शिवाजी विद्यालय, मनोहर भाई पटेल विद्यालय, के.एस जैन विद्यालय , बाबूराव मडावी विद्यालय, वंदना कन्या विद्यालयांच्या चमू सहभागी झाल्या होत्या. यानंतर ज्वलंत सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकणारे अनेक कार्यक्रम शालेय विद्याथ्र्यांनी सादर केले. दरम्यान, विद्याथ्र्यांनी अनेक रंगारंग कार्यक्रमाची मेजवानी यावेळी प्रेक्षकांना दिली. या कार्यक्रमात अनेक गुणवंतांचा येथोचित सत्कार मान्यवरांचे हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे मधुर संचालन मनोहर भाई पटेल विद्यालयाचे शिक्षक मेश्राम यांनी केले. या कार्यक्रमाला तालुक्यात ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, वकील, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय मंडळी, शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अन्य कार्यक्रमात पत्रकार संघाचे ध्वजारोहण संघाचे अध्यक्ष चंचल जैन यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी सुरेश भदाडे, सुरेश चन्ने, सुरेश साखरे, महेंद्र वैद्य, देवेंद्र सेलोकर आदी पत्रकार उपस्थित होते. नगरपंचायतीचे ध्वजारोहण नगराध्यक्ष सुमन बिसेन यांचे हस्ते, पंचायत समितीमध्ये सभापती देवकी मरई, तहसील कार्यालय येथे तहसीलदार संजय नागटिळक, वीज वितरण केंद्रात कार्यकारी अभियंता वाकडे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याशिवाय अन्य शासकीय व निमशासकीय कार्यालय, शैक्षणिक संस्थांमध्ये सुद्धा ध्वजारोहण करण्यात आले.
तालुक्यातील मुल्ला येथे सरपंच भोजराज घासले, वडेगाव येथे छत्रपाल राऊत, ओवारा येथे कमल येरणे, मुल्ला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जि.प. सदस्य दीपक पवार, सावली येथे दयाल पवार यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आल्याचे वृत्त आहे.