शिक्षक अधिवेशनाचे मिडियाने बाऊ करू नये- शरद पवार

0
9

वृत्तसंस्था

मुंबई,दि.6- राज्यात 6 लाख प्राथमिक शिक्षक आहेत. आपल्या समाजातील तो ही एक छोटा घटक आहे. या सर्व शिक्षकांचे 3 वर्षातून एकदा राज्यस्तरीय अधिवेशन होते. त्यामुळे मिडियांनी याचा फार बाऊ करण्याची गरज नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अधिवेशनाला उपस्थित राहूण हाणला.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अधिवेशन नवी मुंबईतील पटणी मैदानावर भरविण्यात आले आहे. या अधिवेशनाला  शिक्षणमंत्री विनोद तावडे, माजी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील,गणेश नाईक,महापौर सुधाकर सोनवणे,आमदार संजीव नाईक,संदीप नाईक,सागर नाईक,आनंद सुतार,स्वागताध्यक्ष खासदार ए.टी.नाना पाटील, शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात व मार्गदर्शक प्रा. एस. डी. पाटील यांच्यासह या अधिवेशनाला राज्यातील कानाकोप-यातून प्राथमिक शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षणसेवक, प्राथमिक पदविधर शिक्षक, निमशिक्षक विषय तद्न्य आदी उपस्थित होते.शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी ज्ञानरचनावाद या विषयावर मार्गदर्शन केले.
 शिक्षकांचे त्रैवार्षिक अधिवेशन होत असेल तर बाऊ करण्याची गरज नाही. तीन वर्षातून 4-5 दिवस पगारी रजा दिल्याने किंवा शाळा बंद राहिल्याने फार बिघडत नाही. नवी मुंबईतील अधिवेशनाला राज्यातील काना-कोप-यातून शिक्षक आले असतील. मला सांगा विदर्भातील, चंद्रपूर, गडचिरोलीच्या एखाद्या शिक्षकाला यायचे झाले तर तो आमच्या नेत्यांसारखा 4 तासात किंवा एका दिवसात पोहचू शकणार आहे का?. तो दाटीवाटीने गाड्या करून, रेल्वेने येथे पोहचला असेल. येता-जाता तो मध्येच औरंगाबादचा बीबी का मकबरा पाहू शकतो. प्रत्येक माणसाला नव-नविन गोष्टी करण्याची, पाहण्याची सवय असते. शिक्षकही त्याला कसा अपवाद असेल असे सांगत पवारांनी शिक्षकांच्या बाजूने विचार मांडले.
या अधिवेशनाला उपस्थित राहणा-या सर्व शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचा-यांना 31 जानेवारी ते 8 फेब्रुवारी 2016 या 9 दिवसाची विशेष पगारी रजा मंजूर आली आहे.  शिक्षक या अधिवेशनाला गेले असल्याने शाळा ओस पडल्याचे  विषय माध्यमांनी लावून धरला. काहींनी कोर्टात धाव घेतली. त्यामुळे शिक्षकांना राज्यस्तरीय अधिवेशनासाठी शासनाने मंजूर केलेली विशेष रजा हायकोर्टाने रद्द केली आहे. यापार्श्वभूमीवर अधिवेशनाला हजेरी लावलेले शरद पवार आणि शिक्षणमंत्री काय भूमिका मांडतात याकडे लक्ष लागले होते. शिक्षणमंत्री तावडे यांनी 75 टक्के शिक्षणाचा व 25 टक्के शिक्षकांचा मंत्री असल्याचे सांगत सातव्या वेतन आयोग असो की इतर मागावे लागणार नाही,फक्त तीन वर्षाचा वेळ द्यावा लागेल असे म्हणाले.संचालन अभिनेत्री अमृता खानविलकर हिने केले.