कॅप्टन असल्‍याचे सांगून एकाने घेतली एअरबेसची माहिती

0
9
वृत्तसंस्था
नवी दिल्ली,दि.6 – जैसलमेर एअरबेससंदर्भात एकाने माहिती घेतली. काही वेळानंतर हा सहा फुट उंच संशयित व्‍यक्‍ती दृष्टीआड झाला. त्‍यामुळे महत्‍त्वाच्‍या ठिकाणांची सुरक्षा वाढवण्‍यात आली आहे. जैसलमेरच्‍या आसनी रोडवर असलेल्‍या एका ज्‍वेलरीच्‍या शोरूमवर शुक्रवारी ही व्‍यक्‍ती आली होती. त्‍याने एक फोटो फ्रेम तेथून खरेदी केली. 1000 रूपयांऐवजी त्‍याने 1500 रूपये दिले नि एअरबेसच्‍या संदर्भात माहिती घेतली. दुकानदार आणि या संशयित व्‍यक्‍तीमध्‍ये संभाषण सुरू असताना संशयिताचा मोबाइल सुरू होता. म्‍हणजे तिसरी व्‍यक्‍तीही ही चर्चा ऐकत होती. दुकानदाराने याबाबत पोलिस आणि एअरफोर्सला तत्‍काळ माहिती दिली. सुरक्षा संस्थांनी सीसीटीव्‍हीच्‍या मदतीने त्‍याचा चेहराही पाहिला. पूर्ण जैसलमेरमध्‍ये शुक्रवार व शनिवारी पोलिसांच्‍या पाच पथकांनी शोध मोहिम चालवली आहे.