मानकर गुरुजी जयंतीनिमित्त १७३ दात्यांचे रक्तदान

0
10

आमगाव दि.७: लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंतीनिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा, युवा शक्ती फाऊंडेशन, लक्ष्मणराव मानकर ऐच्छिक रक्तदान संघटनेच्यावतीने गुरूवारी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यात युवक-युवतींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत १७३ दात्यांनी रक्तदान केले.
उद््घाटन आदिवासी राज्यमंत्री अमरिशराव आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून भाजप महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रामदास आंबडकर, आ. संजय पुराम, माजी आ. भेरसिंग नागपुरे, माजी आ. केशव मानकर, सुरेश असाटी, माजी जि.प. सदस्य छोटू बहेकार, सदु अंजनकर, रक्तदान कार्यक्रमाचे संयोजक यशवंत मानकर, निमेश दमाहे, निखिल कोसरकर, कमलेश चुटे, राकेश शेंडे, ज्योती खोटेले उपस्थित होते. आयोजित रक्तदान शिबिरात भवभूती महाविद्यालय, आदर्श विद्यालय, लक्ष्मणराव मानकर, शैक्षणिक परिसरातील व नगरातील युवतींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. 
भवभूती महाविद्यालय येथे शिबिराचा प्रारंभ प्राचार्य डॉ.एस.एम. भुस्कुटे तर श्री लक्ष्मणराव मानकर शैक्षणिक परिसरात प्राचार्य डॉ. डी.के. संघी यांनी दीप प्रज्वलन व पूजन करून केला. रक्तदान शिबिराला भाजप जिल्हा अध्यक्ष हेमंत पटले, भाजपा माजी जिल्हा अध्यक्ष विनोद अग्रवाल, विरेंद्र अंजनकर, तालुका भाजपा अध्यक्ष अँड. यशुलाल उपराडे यांनी भेट देवून उपक्रमातील युवकांना प्रोत्साहित केले.
रक्तदान कार्यक्रमात पं.स. सदस्य जयप्रकाश शिवणकर, दिनेश थेर, हिमांशू कोरे, बाळा ठाकूर, गजानन चुटे, पराग कटरे ,निखीलेश राऊत, भुवन सलामे, महेंद्र चुटे, समीर खान, आशिष मेश्राम, वैभव मेश्राम, योगेश बनोठे, बालकचंद लिल्हारे, राहुल चुटे, अमित हेमणे, रघुनाथ भूते, किशोर बल्हारे, क्रिष्णा चुटे, घनश्याम अग्रवाल, पद्मा चुटे, अंजली जांभुळकर, मोहिने निंबार्ते, सुनंदा उके, सुषमा भुजाडे, जगदीश बडगे, बाळू भुजाडे व भाजप, भाजयुमो व युवा शक्ती फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.