सालेकसा-देवरी व्हाया मुरपार बसची मागणी

0
12

बेरारटाईम्स स्पेशल

सुरेश भदाडे

गोंदिया (ता.07)- नक्षलग्रस्त आणि अतिदुर्गम भागात राहणाèया आदिवासी बांधवांना शासकीय कामे करण्यासाठी फार लांबचा आणि त्रासदायक प्रवास करावा लागतो. अनेकवेळा तर कामेसुद्धा होत नाही. घरी परतण्यास पुन्हा दगदग सहन करावी लागते. परिणामी, गरीब जनतेचा त्रास कमी करण्यासाठी सालेकसा ते देवरी व्हाया मुरपार बससेवा सुरू करावी, अशी मागणी मुरपार परिसरातील प्रवाशांनी प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान, देवरी- आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांनी याप्रकरणी लक्ष द्यावे, अशी प्रतिक्रिया सुद्धा नागरिकांनी व्यक्त केली.
सविस्तर असे की, सालेकसा व देवरी तालुक्यातील अनेक गावातील जनतेला कामानिमित्त सालेकसा आणि देवरी येथे जावे लागते. देवरी येथे महसूल उपविभागीय कार्यालय आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय सारखी महत्त्वाची कार्यालये आहेत. देवरी तालुक्यात मोडणाèया मुरपार, पुराडा, फुक्कीमेटा, ढिवरीणटोला आदी गावांचा समावेश सालेकसा पोलिस ठाण्याच्या कक्षेत येतो. याशिवाय सालेकसा हा तालुका देवरी उपविभागात मोडतो. त्यामुळे या तालुक्यातील जनतेला सालेकसावरून आमगाव आणि नंतर देवरी असा ६० किलोमीटर लांबचा प्रवास करावा लागतो. याशिवाय बस पकडण्यासाठी पायी वा अन्य साधनाने सालेकसा येथे यावे लागते. तसेच देवरी तालुक्यातील मुरपार परिसरातील लोकांना सालेकसा येथे शासकीय कामानिमित्त जायचे झाल्यास त्यांना सुमारे १० किलोमीटर अंतरावरील लोहारा बसस्थानकावर यावे लागते. त्यामुळे अनेकांची कामे वेळेवर होत नाही. याशिवाय दुर्गम भागातील विद्यार्थी आणि रुग्णांना थेट बससेवा नसल्याने पायी लांब प्रवास करून बस पकडावी लागते.
सालेकसा ते देवरी व्हाया मुरपार बससेवा सुरू केल्याने देवरी व सालेकसा तालुक्यातील प्रवाशांची हेळसांड कमी होण्यास मदत होईल. देवरी ते सालेकसा या ३५ किलोमीटर रस्त्यावर सालेकसा, हेटीटोला, सितेपाला, गोर्रे, लोहारा, शेरपार, वारकीटोला, कोटरा, हलबीटोला, नवाटोला, qसगाटोला, करणुटोला, कोसाटोला, मुरपार, खालवाटोला, टेकरी, महाजनटोला, ढिवरीणटोला, फुक्कीमेटा, शिलापूर, डवकी, भागी आणि देवरी ही गावे आहेत. या ३५ किलोमीटर पक्का रस्त्यामध्ये कोसाटोला ते कोठीघाट या केवळ २ किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. यामुळे स्थानिक आमदार महोदयांनी या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. ही बससेवा तत्काळ सुरू करून जनतेचा त्रास कमी करावा, अशी मागणी मुरपार परिसरातील बुधराम भंडारी, किसन कोरे,गोपाल आचले, हेमप्रकाश आचले, गोपाल प्रधान,रामेश्वर बहेकार, रामेश्वर कुंभलकर, मनीराम आचले, सरपंच सुनीता मळकाम आदी नागरिकांनी केली आहे.