२0 नक्षलवाद्यांचे आत्मसर्मपण

0
7

वृत्तसंस्था

रायपूर,दि.7 : छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बस्तर क्षेत्रातील २0 जहाल नक्षलवाद्यांनी शनिवारी पोलिसांसमक्ष आत्मसर्मपण केले आहे. यात पाच महिला नक्षल्यांचा समावेश आहे. बस्तर क्षेत्रातील पोलीस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार आत्मसर्मपण करणार्‍यांमध्ये बस्तर जिल्ह्यातील एका महिलेसह १0 नक्षलवादी आणि कोंडागाव जिल्ह्यातील चार महिलांसह १0 नक्षल्यांचा समावेश आहे. यामध्ये बस्तर जिल्ह्यातील कटेकल्याण लोकल ऑपरेशन स्क्वॉडची सदस्या पद्मनी व गोलावंड दलमचा माहिती संकलन प्रभारी ठिलूराम यानेही सर्मपण केले.
आत्मसर्मपण करणार्‍या सर्व नक्षलवाद्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. या सर्व नक्षलवाद्यांवर पोलीस पथकावर हल्ला करणे, हत्येचा प्रयत्न आणि रस्ता तोडणे यासारख्या विविध गुन्ह्यात सहभागी असल्याचा आरोप आहे.