शिवाजी महाराजांच्या जयघोषांनी दुमदुमले देवरीचे आसमंत

0
9

शिवाजी महाराजांची 386वी जयंती उत्साहात साजरी

देवरी (ता.19)-  ‘जय शिवाजी, जय भवानी’, ‘हर हर महादेव ‘,’जाणता राजा शिवाजी महाराज की जय ‘ अशा गगनभेदी जयघोषाने आज (ता.19) देवरीचे आसमंत दणाणून सोडले. शिवाजी महाराजांच्या 381 व्या जयंती निमित्ताने देवरीच्या रस्त्यावरून शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

देवरी येथे 386 व्या शिवजयंती निमित्ताने कृष्णा सहयोगी तंत्रशिक्षण संस्थेद्वारा संचालित शिवाजी शिक्षण संकुलात आज अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त शिवाजीच्या जीवनावर प्रकाश टाकण्याच्या उद्देशाने शोभायात्रेचे आय़ोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेत शेकडो विद्यार्थी, संस्थेतील कर्मचारी आणि शहरातील अनेक गणमान्य व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. शोभायात्रेत शिवाजी महाराजांच्या कालखंडातील अनेक प्रभावशाली देखावे तयार करण्यात आले होते. या शोभायात्रेत वेगवेगळ्या रंगभूषा परिधान केलेले विद्यार्थी लोकांचे लक्ष आकर्षित करीत होते. ही शोभायात्रा शिवाजी संकुलातून साडे दहाच्या सुमारास काढण्यात आली. ही शोभायात्रा, चिचगड रोड, मुलगंध कुटी, पंचशील चौक, गणेश चौक, राष्ट्रीय महामार्ग असे मार्गक्रमण करीत शिवाजी संकुलात परत आणण्यात आली. कायदा व सुव्यवस्था हाताळण्यासाठी संस्थेने स्वयंसेवकांची नेमणुक केली होती. देवरी पोलिसांनी सुद्धा चोख बंदोबस्त लावला होता. गुरुदेव सेवा मंडळ आणि इतर स्वयंसेवी संस्थांनी विद्यार्थी आणि शोभायात्रेत सहभागी लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली होता.