आटपाडी कबरस्थानसाठी जयंत पाटील, फौजिया खान यांच्यामुळे २५ लाख रुपये उपलब्ध

0
8

सादिक खाटीक यांच्या प्रयत्नांना यश .

सांगली दि . २-आटपाडीच्या सर्वे नंबर १३८९, गट नंबर ४२१६ मधील मुस्लीमांच्या कबरस्थान मध्ये सभामंडपा साठी माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा, माजी मंत्री खासदार फौजिया खान यांच्यामुळे २५ लाख रुपयेचा निधी उपलब्ध झाला असून सादिक खाटीक यांच्या प्रयत्नाला यश आले आहे .
आज सांगलीत हॉटेल आयकॉन येथे खासदार फौजिया खान यांनी त्यांच्या खासदार फंडातून या सभा मंडपासाठी २५ लाखाच्या निधीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक यांच्याकडे दिले. यावेळी तेहसीन खान साहेब, माजीद पटेल, आबीद पटेल, गुफरान पटेल, इन्नुस खाटीक, दाऊत हसन शेख, रियाज शेख, बाळासाहेब उर्फ सलीम वंजारी, बाबु उर्फ असिफ खाटीक, सुरज उर्फ बबलु भागवत इत्यादी मान्यवर उपस्थित होते .
आटपाडीतील खाटीक, वंजारी, फकीर, शेख, कलाल, सय्यद, पेंढारी, कसाई, बेपारी, मुरसल, तांबोळी, आतार, कोतवाल, बागवान, पिंजारी, नदाफ, सारवान, कळवात, शिकलगार, मोमीन, मेहतर, राणेबिंदूर , महात, दरवेशी वगैरे अठरापगड, उपेक्षित, मागास, रयत मुस्लीम बांधवांसाठी हे सभामंडप अति अत्यावश्यक आहे . गेल्या अनेक वर्षापासून हे समाज बांधव रमजान ईद, बकरीद ईद वगैरे महत्वाच्या सार्वजनिक नमाजाचे पठण कबरस्थान मधील उघड्या शेड मध्ये उन – वारा – पाऊस यामध्ये करत असतात . मयताच्या जनाजाची नमाजही कबरस्थानच्या मोकळ्या जागेत होते . थोडक्यात वर्षभरातले सर्व धार्मिक, सामाजीक सोपस्कर याच कबरस्थान मधील मोकळ्या जागेत पार पाडले जाते . आटपाडी नगरपंचायत हद्दीतील सुमारे शेकडो मुस्लीम समाज बांधव या असुविधेला नेहमीच सामोरे जात आले आहेत .
४८ गुंठे एकूण क्षेत्रापैकी ४ गुंठे मोकळ्या जागेत २५ लाखाचे सभामंडप उभारल्यास हे सर्व सोपस्कर पार पाडले जावू शकतेच तथापि शालेय विद्यार्थी, विद्यार्थीनी, महिला, पुरुष, समाज बांधव या ठिकाणी विविध चांगल्या उपक्रमाच्या माध्यमातून प्रबोधनाची चळवळ राबवत राहतील. अशा भूमिकेतून माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या माध्यमातून खासदार फौजिया खान यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता .