छात्रभारती संघटनेच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या भूमिकेचे समर्थन – कविताताई कर्डक

0
11
*शाळेमध्ये अंधविश्वासाला थारा देऊ नये हीच समता परिषदेची भूमिका*
*नाशिक,-राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सत्यशोधक समाज पुरस्कार सोहळ्यात मांडलेल्या भूमिकेबद्दल छात्र भारती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भुजबळ फार्म येथील कार्यालयात त्यांची भेट घेऊन त्यांनी घेतलेल्या भूमिकेचे समर्थन करत सत्कार केला असल्याची माहिती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या नाशिक शहराध्यक्षा कविताताताई कर्डक यांनी दिली
यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या शहराध्यक्ष कविता कर्डक, प्रदेश चिटणीस समाधान जेजुरकर, छात्रभारती राज्यकार्याध्यक्ष समाधान बागुल, नाशिक शहराध्यक्ष देविदास हजारे, राज्य सदस्य प्रिया ठाकूर, माजी उपाध्यक्ष सागर निकम, स्वप्नील कुंभारकर, प्रशिक सोनवणे, राम सुर्यवंशी, सौरभ साळवे, गौरव जाधव, रिहान शहा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
समाजातील काही लोकांकडून छगन भुजबळ यांच्या भूमिकेचा विरोध करण्यात येत आहे. महापुरुषांचे समतेचे व विज्ञानवादी विचारांचा पुरस्कार माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून केला जात आहे. या भूमिकेला आम्ही समर्थन करत असल्याची भूमिका छात्र भरती संघटनेने मांडली.
सत्यशोधक समाजाला १५० वर्ष पूर्ण झाली याबाबत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून सत्यशोधक चळवळीत काम विचारवंतांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी भुजबळ साहेबांनी शाळेत महापुरुषांच्या प्रतिमा लावा अशी भूमिका घेतली मात्र काही मंडळींनी त्याचा विपर्यास करत त्याला जातीयवादी रंग देण्याचा प्रयत्न केला हे दुर्दैवी आहे असे मत देखील कविताताई कर्डक यांनी दिली.
सत्य काय ते शोधा आणि त्यावर विश्वास ठेवा हे सत्यशोधक चळवळीचा मुख्य हेतू आहे.ज्यांनी आयुष्यभर खस्ता खाऊन बहुजन समाजाला शिक्षण दिले. त्या महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करावं अशी भूमिका भुजबळ साहेबांनी मांडली होती.शाळेमध्ये अंध विश्वासाला थारा देऊ नये हीच आपली अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची भूमिका असल्याचे देखील कविताताई कर्डक यांनी सांगितले.