सत्यपाल सिंह यांनी सरकारी फ्लॅट दिला भाड्याने

0
7

मुंबई – २ वर्षापासून ४८ हजार ४२० रुपये इतकी दंडाची रक्कम भरण्यास कायदाचे पालन करण्याचा नेहमीच दावा करणारे भाजप खासदार आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह तयार नसल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना मिळाली आहे. विना परवानगी मुंबईतील सरकारी जमिनीवरील पाटलीपुत्र संस्थेतील सदनिका भाडयाने देण्याचा गंभीर डॉ. सत्यपाल सिंह यांच्यावर आरोप आहे.

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी विना परवानगी सदनिका देणाऱ्यावर केलेल्या कारवाईची माहिती मागितली होती. अनिल गलगली यांना विविध सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नस्तीची पाहणी करण्यास पाचारण करण्यात आले. जवळपास १० हून अधिक नस्तीची पाहणीत पाटलीपुत्र, साईप्रसाद, संगम या गृहनिर्माण संस्थेतील काही कागदपत्र अनिल गलगली यांना देण्यात आली. पाटलीपुत्र सहकारी गृहनिर्माण संस्थेत दहाव्या मजल्यावर सदनिका असलेले डॉ. सत्यपाल सिंह यांनी आजपर्यंत ४८ हजार ४२० रुपये इतकी दंडाची रक्कम अदा केली नसून, जिल्हाधिकारी यांनी २८ जानेवारी २०१५ रोजी त्यांना नोटीस पाठविली आहे. डॉ सत्यपाल सिंह यांनी दिनांक २८ जानेवारी २०१३ रोजी पत्र लिहित रु ५ हजार ३८० रुपयांचा धनादेश पाठविला होता.