प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण

0
7

मुंबई, दि.26 : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण करून भारतीय तिरंग्यास मानवंदना दिली.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांसह राज्यातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र पोलीस दलाच्यावतीने राष्ट्रगीत सादर करण्यात आले व राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली.  यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी व वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी वर्षा निवासस्थानी उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

मुंबई, दि.  26 : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त  जिल्हाधिकारी राजीव निवतकर  यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथे झालेल्या शासकीय सोहळ्यात राष्ट्रीय ध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

यावेळी मुंबई शहराचे अपर जिल्हाधिकारी रामदास खेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी सदानंद जाधव, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) कल्याण पांढरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री. निवतकर यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना तसेच आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनामहात्मा जोतिराव फुले जन आरोग्य या योजनेमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या रुग्णालयांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. यावेळी प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी श्री. निवतकर  सर्वांना शुभेच्छा दिल्या.