जळगांव जिल्हयातील जनतेसाठी दिल्लीकरिता राजधानी एक्सप्रेस रेल्वे

0
43

मुंबई, दि. १ एप्रिल – जळगांव जिल्हयातील जनतेस देशाच्या राजधानीत अर्थात नवी दिल्‍ली येथे जाण्यासाठी राजधानी एक्सप्रेस सुरु करण्याचा प्रस्ताव तयार झाला असून मान्यतेसाठी तो रेल्वे मंत्रालयास सादर करण्यात आला आहे, अशी माहिती रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी राज्याचे महूसल मंत्री एकनाथराव खडसे यांना दिली. या रेल्वे गाडीस लवकरात लवकर मान्यता देऊन अशी रेल्वे सुरु करण्याबातची खानदेशातील जनतेची दीर्घकालीन मागणी पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासनही सुरेश प्रभू यांनी दिले आहे.
खानदेशातील बहुतेक रेल्वे गाडया सुरु करण्यामध्ये रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी नेहमीच महत्वाची भूमिका बजावली असल्याने राजधानी एक्सप्रेस ही रेल्वे गाडी आता लवकर सुरु होईल, असा विश्वास खडसे यांनी व्यक्त केला आहे.
प्रस्तावित राजधानी एक्सप्रेस ही रेल्वे गाडी मुंबईहुन दुपारी २.०० वाजता सुटणे प्रस्तावित असून ती भुसावळ येथे रात्री ८.०० वाजताच्या सुमारास येईल. तर नवी दिल्ली येथे सकाळी ८.०० ते ९.०० च्या दरम्यान पोहचेल.ही राजधानी एक्सप्रेस आठवडयातून ५ दिवस धावणार असूनती नाशिक ह्न भुसावळ ह्न भोपाळ ह्न मथुरा हे थांबेल.
नवी दिल्लीसाठी नाशिक ह्न भुसावळ मार्गे राजधानी एक्सप्रेस रेल्वे गाडी सुरु होण्याकरिता महाराष्ट्रातील खासदार ए.टी.नाना पाटील, रक्षाताई खडसे, हरिश्चंद्र चव्हाण, सुभाष भामरे यांनी सतत पाठपुरावा केला.