पंकजा मुंडेंनी घेतले शनिदर्शन;तृप्ती देसाईंचं ठिय्या आंदोलन

0
9

अहमदनगर, दि. २ –  शनिशिंगणापुरातील शनी चौथ-यावरील प्रवेशाचा वाद सुरु असताना  ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी नगर जिल्ह्यातीलच पाथर्डी शहरात शनी चौथ-यावर जाऊन तेल वाहिले. महिलांना मंदिरात जाताना अडविता कामा नये, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर मुंडे यांनी हे शनिदर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार भीमराव धोंडे यांच्यासह इतर कार्यकर्ते होते़. या मंदिरात आजवर महिला दूरुनच शनिचे दर्शन घेत होत्या. ती परंपरा मुंडे यांनी झुगारली आहे. 

शनी चौथ-यावर प्रवेश करण्यापासून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आणि कार्यकर्त्यांना रोखल्याने शनिशिंगणापूरमधील वातावरण चिघळले आहे. तृप्ती देसाई यांनी मंदिर परिसरातच ठिय्या आंदोलन केलं असून जोपर्यंत दर्शन मिळणार नाही तोपर्यंत जाणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. जर आम्हाला दर्शन मिळालं नाही तर आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात एफआयआर दाखल करु असंही तृप्ती देसाई यावेळी बोलल्या आहेत.