झारखंडमध्ये नक्षलवाद्यांच्या भूसुरुंग स्फोट

0
13
रांची दि. २ – नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवत पुन्हा एकदा सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला आहे. दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 5 जवान जखमी झाले आहेत. सीआरपीएफ जवान पेट्रोलिंग करत असताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. चितपूर गावात 12.15 वाजता हल्ला करण्यात आल्याची माहिती बोकारो रेंजचे डीआयजी उपेंद्र कुमार सिंग यांनी दिली आहे. या हल्ल्यानंतर जवानांसोबत पेट्रोलिंगवर असणा-या पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकदेखील झाली . सर्व जखमी जवानांना विमानाच्या सहाय्याने रांचीला नेण्यात आलं आहे.