अहमदनगर येथे व्हीआयपी शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन

0
7

अहमदनगर, दि.26 मे – व्हीआयपी शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे-पाटील, आमदार बबनराव पाचपुते, आमदार प्रा.राम शिंदे, आमदार मोनिकाताई राजळे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बविस्कर आदी उपस्थित होते.

10 कोटी 88 लक्ष रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या निधीतून दोन मजली सुसज्ज इमारत उभी होत आहे. पहिल्या मजल्यावर 2 व्हीव्हीआयपी तर एक व्हीआयपी सूट, मिटिंग हॉल, डायनिंग हॉल स्वागत कक्ष आदी तर दुसऱ्या मजल्यावर 2 व्हीव्हीआयपी तर 3 व्हीआयपी सूट उभारण्यात येणार आहे. 75 व्यक्तींची क्षमता असलेल्या सभागृहाचाही यामध्ये समावेश आहे.