माझ्याविरोधात मिडिया ट्रायल-एकनाथ खडसे

0
6

मुंबई,दि.4- येथील भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात महसुलमंत्री एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि एकनाथ खडसे यानी सयुंक्त पत्रपरिषद घेऊन राजीनाम्याची पाश्वभूमी आणि खडेसवर लावण्यात आलेल्या आरोपांबद्दल सप्षटीकरण देत विरोधकांनी रचलेले षडयंत्र असल्याचे म्हटले आहे.मी गेल्या वर्षभरात एकही आंतरराष्ट्रीय कॉल केलेला नाही.नितीन गडकरी, लालकृष्ण आडवाणी यांच्यावरही यापूर्वी असे अनेक आरोप झाले परंतु ते सुध्दा खोटे निघाले तसेच आरोप खोटे निघतील त्यानंतरच मी मंत्रीपरिषदेत येणार तोपर्यंत मी आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्री यांना देण्यास जात असल्याचे खडसे म्हणाले.त्याचवेळी दानवे यांनी भाजप मात्र खडेसंच्या बाजुने भक्कमपणे उभा असल्याचे सांगितले.

माझ्यावरील आरोप खोटे असून आपल्या 40 वर्षाच्या राजकारणात कधीही असे काम केले नाही.पक्षाच्या बळकटीसाठीच नेहमीच काम करीत राहिलो आहे.माझ्या जावईवर सुध्दा खोटे आरोप करण्यात आले.मी माझ्या निवडणुकीच्यावेळी सर्व माहिती दिलेली आहे.जर खोटी माहिती दिली असती तर माझी आमदारकी कधीच रद्द झाली असती.एमआयडीसीच्या जमीनीच्या संबधी जे आरोप करतात ते सुध्दा खोटे आहेत.त्यासंबधीचे पुरावे देण्यात यावे.पुण्याच्या काॅलेजच्या जमीनीची तक्रार पोलीसात करण्यात आली होती परंतु कारवाई होत नव्हती तेव्हा आपण कृषीमंत्री आपण पोलीसांनी याप्रकरणी लक्ष घालण्याचे निर्देश देत शासकीय जमिनीची लूट थांबविण्याचे काम केले आणि खोट्य़ा कागदपत्राच्या आधारे जमिन हडपण्याचा डाव उधळून लावला आहे.माझ्यावर मिडीया ट्रायलच्या माध्मयातून मला बदनाम करण्याचे प्रयत्न करण्यात आले मी मुख्यमंत्र्यांनी चौकशी करण्यात यावी अशी विनंती केली असून माझ्या फेसबुकवर मी माझे सर्व कागदपत्र टाकली आहे असे एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.