खडसेंच्या राजीनाम्यानंतर शिवसैनिकांनी फटाके फोडले

0
15

जळगाव,दि.4-  अनेक आरोपांच्या चक्रव्युहात अडकलेल्या एकनाथ खडसे यांची अखेर गच्छंती झाली आहे. आरोपांचे च्रकव्यूह भेदण्यात अयशस्वी ठरलेल्या खडसेंनी सर्व मंत्रिपदाचे राजीनामे देताच जळगावमध्ये शिवसैनिकांनी फटाके फोडून आनंद साजरा केला.त्यामुळे भाजप व शिवसेनेत तणावाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.त्याचवेळी जळगावातील भाजप कार्यालय मात्र ओसाड पडले आहे.दरम्यान खडसेंचा बालेकिल्ला असलेला मुक्ताईनगर मतदारसंघातही शुकशुकाट पाहायला मिळत आहे. काही भाजप कार्यकर्त्यांनी रास्ता रोखून निषेध व्यक्त केला आहे. तर काही ठिकाणी दुकानं बंद झाली आहेत.घऱी जावई आणि मुलगी असून पोलिसांचा चोक बंदोबस्त ठेवम्यात आला आहे.