रायगडच्या विकासासाठी ५०० कोटींच्या आराखड्यास मंजुरी

0
5

रायगड दि. 6 – रायगड किल्ला आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी कोकण विभागीय आयुक्तांनी तयार केलेल्या ५०० कोटी रुपयांच्या आराखड्यास आपण याच ठिकाणी मंजुरी देत आहोत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावेळी उपस्थित हजारो शिवप्रेमींनी टाळ्यांच्या कडकडाटात या निर्णयाचे स्वागत केले.

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड यांच्या वतीने किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा सोमवारी साजरा करण्यात आला.