विरेंद्र तावडेला २० जूनपर्यंत सीबीआय कोठडी

0
7

पुणे, दि. १६ – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्ये प्रकरणी सीबीआयने अटक केलेल्या विरेंद्र तावडेला २० जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. सीबीआयने गुरुवारी तावडेला शिवाजीनगर कोर्टात हजर केले. मागच्यावेळी त्याला १६ जूनपर्यंत कोठडी सुनावण्यात आली होती.

आज मुदत संपत असल्याने त्याला पुन्हा हजर करण्यात आले. त्यावेळी त्याला आणखी चार दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणी तावडेला मागच्या शुक्रवारी सीबीआयने अटक केली. या प्रकरणात झालेली पहिली अटक आहे.