दुर्बलांच्या शैक्षणिक पंखांना ‘स्वाभिमानी’ बळ

0
12

गोंदिया : शिक्षण घेऊन उतुंग भरारी घेण्याचे स्वप्न असतानादेखील अनेकदा अनेकांच्या वाट्याला आर्थिक अडचणींचा डोंगर उभा होतो. परिश्रम करण्याची जीद्द चिकाटी असली तरी आर्थिक अडचणीमुळे समाजातील अनेक घटक शिक्षणापासून वंचित राहतात. अशाच वंचितांच्या शैक्षणिक पंखांना मदतरुपी बळ देवून भरारी घेण्यास सज्ज करण्याचा विडा युवा स्वाभिमानने घेतला आहे. युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे यांनी गरजु व होतकरू २० सावित्रीच्या लेकींना त्यांचे प्रशिक्षण शुल्क भरून शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे.
गोंदिया येथील ज्ञान गंगा प्रशिक्षण वेंâद्रात संगणक प्रशिक्षणासह, ब्युटी पार्लर, सिलाई प्रशिक्षण, टेडी बिअर्स निर्मिती, कुशन कवर्स निर्मिती क्लासेस, स्पेशल ड्रार्इंग असे विविध प्रशिक्षण दिले जातात. यात शेकडो विद्यार्थीनी व महिला प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत. दरम्यान आर्थिक अडचणीमुळे अनेकांना इच्छा असतानाही प्रशिक्षण घेणे शक्य नसते, अशा गरजू २० प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण शुल्क जितेश राणे यांनी भरले. पहिल्या टप्प्यात १० प्रशिक्षणार्थी आणि दुसNया टप्प्यात १० अशा २० प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक शुल्काचे धनादेश दिले. यावेळी जितेश राणे यांच्यासह युवा स्वाभिमानचे सुनिल वाघमारे, भरत शरणागत, टोकेश हरिणखडे, जीवन शरणागत, जगदीश रहांगडाले, अरविंद टेंभरे, मनोज बिसेन, अजय शहारे उपस्थित होते. दरम्यान प्रशिक्षण वेंâद्राच्या संचालिका स्मिता मेंढे, शिक्षिका अनिता नखाते, दिपीका राऊत, सुरेश पाऊलझगडे, मिरा पाऊलझगडे यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाला प्रशिक्षण वेंâद्रातील आशा यशनसुरे, संध्या उके, शहनाज सय्यद, शालु नंदेश्वर, कला भोयर, पौर्णिमा पेंडारकर, निखत सय्यद, नेहा दरवडे, प्रतिमा खांडेकर, सविता सोनवाने आदिंसह अनेक प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. गरजुंच्या शैक्षणिक पंखांना बळ देणारे जितेश राणे यांचे प्रक्षिणार्थी युवती व महिलांनी आभार मानले आहे.