पूर्व विदर्भातून मॉन्सून महाराष्ट्रात दाखल

0
11

पुणे : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मॉन्सूनचे अखेर आज (शनिवार) महाराष्ट्रात आगमन झाले. एरवी तळकोकणातून दाखल होणारा मॉन्सून यंदा पूर्व विदर्भातून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. गेले अनेक दिवस गोव्यापर्यंतच रेंगाळणाऱ्या मॉन्सूनची आगेकूच शुक्रवार रात्रीपासून सुरू झाली.महाराष्ट्रात मान्सूनतेच्या सक्रीयतेसाठी अनुकूल वातावरण आहे. बिहार, ओदिशा आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यातही मान्सून दाखल झाला आहे. बिहार, ओदिशा, पश्चिबंगाल, विदर्भ, छत्तीसगड, तेलंगण, कर्नाटक आणि केरळमध्ये भारतीय हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.