खडसे आरोपांतून मुक्त होतील – मुख्यमंत्री

0
6

पुणे, दि. १८ – भाजपच्या दोन दिवसाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीसाठी पुण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माजी मंत्री एकनाथ खडसे यांची पाठराखण केली. एकनाथ खडसे यांच्यावरील आरोप तथ्यहीन असून लवकरच ते यातून बाहेर पडतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. एकनाथ खडसे यांच्या मोबाईलवर दाऊदकडून कुठलाही कॉल आलेला नाही हे एटीएसच्या तपासात स्पष्ट झाले आहे.भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक आजपासून (शनिवार) पुण्यात होत असून, या बैठकीला राज्यातील प्रमुख नेते उपस्थित आहेत. या बैठकीला जमीन गैरव्यवहाराचा आरोप असलेले माजी मंत्री एकनाथ खडसेही उपस्थित आहेत. केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, पियूष गोयल, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह राज्यातील मंत्री व नेते उपस्थित आहेत.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी लाटलेले भूखंड परत करावेत, मग सरकारवर आरोप करावेत. मंत्र्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. चौकशीच्या अग्नीपरिक्षेतून नाथाभाऊ यशस्वीरित्या नक्कीच बाहेर येतील. सध्या चौकशी सुरु असल्याने त्यावर बोलणार नाही. ज्यादिवशी आम्ही भ्रष्टाचार करु, त्यावेळीच पद सोडून घरी जाऊ.
सरकार अनेक आघाड्यांवर काम करीत आहे़, सरकार काय करते आहे, ते समजून घ्या़ शेतक-यांना विमा दिला, १ कोटी शेतक-यांना ४ हजार कोटींचा विमा वाटप केले, असे त्यांनी सांगितले़.